Join us

सिगारेट नाकारल्याच्या रागात पान टपरी चालकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:24 IST

आरोपीला अटकसिगारेट नाकारल्याच्या रागात पान टपरी चालकाची हत्याआरोपीला अटक : आईसह भावावर जीवघेणा हल्लालोकमत न्यूज नेटवर्क...

आरोपीला अटक

सिगारेट नाकारल्याच्या रागात पान टपरी चालकाची हत्या

आरोपीला अटक : आईसह भावावर जीवघेणा हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उधारीवर सिगारेट नाकारल्याच्या रागात गुरुवारी सकाळी वांद्रे परिसरात पान टपरी चालकाची हत्या करण्यात आली. तर त्याची आई आणि १५ वर्षीय भावावरही हल्ला करण्यात आला. पाेलिसांनी आरोपीला अटक केली.

वांद्रे ट्रक टर्मिनल्सजवळील गेट क्रमांक १८ येथे मुद्स्सर खान याची पानाची टपरी आहे. या ठिकाणी आरोपी समीर खानने येऊन उधारीवर सिगारेट मागितली. मात्र खानने त्याला नकार दिल्याच्या रागात समीरने जवळच असलेल्या नारळपाण्याच्या दुकानातील चाकू उचलून त्याचा गळा चिरला. त्याला अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या आई तसेच भावावरही हल्ला करून ताे पसार झाला. यात मुद्स्सरचा मृत्यू झाला. समीरही हल्ल्यात जखमी झाल्याने व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारांसाठी गेला हाेता तेथेच त्याला पोलिसांनी अटक केली.

............................