Join us

मस्जिद बंदर येथे वृद्धाची ह्त्या

By admin | Updated: January 7, 2017 20:51 IST

मस्जिद बंदर येथे एका ७२ वर्षीय वृद्धाची हत्या झाली असून लुटीतून हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ -  मस्जिद बंदर येथे शनिवारी वृद्ध इक्बाल दरवेशची ह्त्या करण्यात आली आहे. ते 72 वर्षाचे होते. लूटीतून त्यांची ह्त्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी पायधुनी पोलीस अधिक तपास करत आहेत.
      मोहम्मद अली रोडवर दरवेश हे कुटुंबियांसोबत राहायचे. दारुवाली म्हणून प्रसिद्द असलेल्या जेनाबाई दरवेश यांचा इक्बाल मोठा मुलगा होता. शनिवारी अनोळखी इसमाने त्यांचे हात पाय बांधून त्यांची राहत्या घरी हत्या केली आहे. रात्री ८ च्या सुमारास ही बाब उघडकीस येताच पायधुनी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी इक्बाल यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पठविला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहीती पायधुनी पोलिसांनी दिली.