Join us
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून तरुणाची हत्या

By admin | Updated: January 4, 2016 02:34 IST

किरकोळ वादातून खेरवाडीमध्ये मोहम्मद अली शेख (२७) या तरुणाची शुक्रवारी निर्घृण हत्या करण्यात आली. खेरवाडी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत गुन्ह्यांची उकल करत,

मुंबई : किरकोळ वादातून खेरवाडीमध्ये मोहम्मद अली शेख (२७) या तरुणाची शुक्रवारी निर्घृण हत्या करण्यात आली. खेरवाडी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत गुन्ह्यांची उकल करत, आरोपी त्रिकुटाला अटक केली आहे. रमेश निशाद (२३), मुकेश निशाद (२१) आणि राजू साकेत (१८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.राजू साकेतसोबत शेखचा किरकोळ वाद झाला होता. १ जानेवारी रोजी जाब विचारण्यासाठी राजूसोबत त्याचे दोन मित्र शेखकडे गेले. तिघांनी शेखला मारहाण केली. नागरिक जमत असल्याचे पाहून शेखला रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपींनी पळ काढला. शेखला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)