Join us

क्रेन ऑपरेटरची हत्या; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 01:46 IST

शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार बीकेसी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुंबई : वांद्र्यात अजितकुमार सहाणी नामक तरुणाची हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार बीकेसी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.अजितकुमार हा वांद्रे परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी क्रेन आॅपरेटर म्हणून काम करायचा. शुक्रवारी रात्री तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. याची माहिती बीकेसी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारांसाठी भाभा रुग्णालयात दाखल केले.तेथे डॉक्टरांनी त्याला तपासत मृत घोषित केले. त्यानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्या अहवालानुसार त्याची गळा आवळून हत्या झाल्याचे उघड झाले.