Join us
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपरमध्ये चुलत भावाची हत्या

By admin | Updated: November 6, 2015 03:04 IST

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाने चुलत भावाची हत्या केल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घाटकोपर येथे घडली होती. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी

मुंबई : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाने चुलत भावाची हत्या केल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घाटकोपर येथे घडली होती. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत बुधवारी आरोपीला अटक केली आहे.जितेंद्र गिरी (२२) असे या मृत तरुणाचे नाव असून तो घाटकोपरमधील कामराज नगर येथे कुटुंबीयांसह राहत होता. त्याच्या शेजारी राहणारा आरोपी रवींद्र गिरी याच्या पत्नीसोबत जितेंद्रचा भाऊ महेंद्रचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. याबाबत त्याने महेंद्रला समजवण्याचे जितेंद्रला सांगितले. मात्र जितेंद्रने आरोपीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याने आरोपीने २७ आॅक्टोबरला जितेंद्रला दारू पिण्याच्या बहाण्याने घाटकोपरमधील सर्व्हिस रोड परिसरात नेले. याठिकाणी आरोपीने गळा चिरून त्याचा मृतदेह एका नाल्यात टाकला. रात्री उशिरापर्यंत जितेंद्र घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी परिसरात त्याचा शोध घेतला. त्यानंतर पंतनगर पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली. मात्र आठ दिवसांनंतरदेखील जितेंद्रचा काहीच पत्ता न लागल्याने आरोपीने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार बुधवारी जितेंद्रचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत करून आरोपीला अटक केली आहे.(प्रतिनिधी)