Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत अल्पवयीन मुलांची अत्याचारानंतर हत्या

By admin | Updated: January 1, 2015 16:06 IST

मुंबईत भुरटे चोर म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांनी अन्च्याय तीन साथीदारांसह दोन अल्पवयीन मुलांवर सामूहिकरीत्या अनैसर्गिक अत्याचार केला.

मुंबई : व्ही. पी. रोड पोलिसांनी भुरटे चोर म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांच्या चौकशीतून दोन गंभीर गुन्हयांची उकल झाली. या तिघांनी अन्य तीन साथीदारांसह दोन अल्पवयीन मुलांवर सामूहिकरीत्या अनैसर्गिक अत्याचार केला. यानंतर दोघांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली. यापैकी एक गुन्हा बहुचर्चित शक्तिमिलच्या निर्जन आवारात घडल्याची धक्कादायक महिती या तिघांच्या चौकशीतून समोर आली.राजकुमार सिंघराज रापन्नन उर्फ कालीअण्णा (२३), सुनील नंदकिशोर कुमार (३०) आणि विशाल शालीग्राम पडघान (३०) अशी या तिघांची नावे असल्याचे समजते. व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याचे निरिक्षक (गुन्हे) संजय कांबळे यांना २९ डिसेंबरला तीन सराईत चोरटे घरफोडीसाठी गुलालवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण अधिकारी एपीआय सणस, गुन्डाविरोधी पथकाचे अधिकारी बिडवे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर या तिघांनी दोन गंभीर गुन्हयांची कबुली दिली.यापैकी पहिला गुन्हा सप्टेंबर २०११मध्ये महालक्ष्मी परिसरातील बहुचर्चित शक्ती मिलच्या निर्जन आवारात घडला. या तिघांनी सिराज, राज चिकना उर्फ मुस्तफा, करण या अन्य तीन साथीदारांसह विक्की नावाच्या तरूणावर आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केले. पुढे चाकूने त्याच्या देहाची खांडोळी केली. शीर धडावेगळे करून वेगवेगळया ठिकाणी फेकून दिले. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चौकशी केली. तेव्हा सप्टेंबर २०११मध्ये ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी या प्रकरणी हत्या व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नोंदविल्याची माहिती समोर आली.दुसरा गुन्हा यावर्षी २०१४मध्ये मरिनड्राईव्ह परिसरात घडला. अटकेत असलेल्या तिघांनी राजाभैया, राजा आणि देवथापा यांच्यासह सलमान उर्फ अली या अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह समुद्रात फेकून पळ काढला होता. या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद आहे. ही माहिती मिळताच व्ही. पी. रोड पोलिसांनी तात्काळ तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मरिन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)शक्ती मिलमधील सिराजची होणार चौकशी?दोन वर्षांपूर्वी शक्तिमिलमध्ये दोन तरुणींवर सामूहिक बलात्काराचे गुन्हे घडले होते. या गुन्हयात अटक केलेल्यांमध्ये सिराज नावाच्या आरोपीचा सहभाग आहे. व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनीही २०११च्या गुन्हयात सहआरोपींमध्ये सिराजचा सहभाग होता, अशी माहिती उघड केली आहे. हा सिराज एकच आहे का हे शोधून काढण्यासाठी शक्तिमिल सामूहिक बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या सिराजची चौकशी होऊ शकते.