Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुन्ना झिंगाडाच्या भावाला मारहाण

By admin | Updated: June 3, 2017 06:48 IST

जुहू परिसरात हुक्का पार्लर चालवित असलेल्या कुख्यात गुंड मुन्ना झिंगाडा याचा भाऊ आरिफला बेदम मारहाण केल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: जुहू परिसरात हुक्का पार्लर चालवित असलेल्या कुख्यात गुंड मुन्ना झिंगाडा याचा भाऊ आरिफला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली. बंदुकीच्या धाकावर अपहरण करत त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी शुक्रवारी एकाला अटक केली असून, तिघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.जुहू तारा रोड परिसरात ‘रिअलाइझ कॅफे’ नामक हुक्का पार्लर आहे. याचा मालक कुख्यात गुंड मुन्ना झिंगाडा याचा भाऊ आरिफ आहे. झिंगाडा याच्यावर डॉन छोटा राजन याच्यावर गोळीबार करण्याचा आरोप आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीतून आसिफ शेख नावाच्या इसमासोबत आरिफचा वाद झाला होता. गुरुवारी रात्री आरिफला शेखने फोन करून जुहूत एका हॉटेलजवळ बोलावले. तेथे बंदुकीचा धाक दाखवत पन्नास लोकांनी त्याचे अपहरण केले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्याच्याकडील ७५ हजार रुपये आणि त्याचे रोलेक्सचे घड्याळ घेतले, असा आरोप आसिफने पोलिसांकडे केला. त्यानुसार, पोलिसांनी शेखला अटक केली.