Join us  

पालिकेचे अ‍ॅप दाखविणार वाहनतळांचा पत्ता, मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 2:49 AM

अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने दहा हजार रुपयांपर्यंत दंड ठोठाविण्यास सुरुवात केली.

मुंबई : अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने दहा हजार रुपयांपर्यंत दंड ठोठाविण्यास सुरुवात केली. मात्र, वाहनतळे कुठे आहेत? आणि वाहन उभे करण्यासाठी जागा असेल का? ही माहिती आगाऊ कळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून येत होती. मात्र, ‘MCGM 27x7’ अ‍ॅपद्वारे त्या परिसरातील ५०० मीटर आणि पाच किलोमीटरपर्यंत महापालिकेचे व बेस्टचे वाहनतळ शोधणे शक्य होणार आहे.मुंबईत रस्त्यावरचे वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहतूककोंडीची समस्या वाढली. सार्वजनिक वाहनतळ ओस पडत असल्यामुळे पालिका प्रशासनाने २६ ठिकाणी सार्वजनिक वाहनतळांच्या पाचशे मीटर परिसरात पार्किंगवर बंदी घातली, तसेच दंडाची रक्कम थेट दहा हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. या कारवाईमुळे वाहनतळांमध्ये पार्किंगचे प्रमाण वाढले, परंतु वाहनतळाची माहितीही उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार मोबाइलवरील अँड्रॉइड अ‍ॅपमध्ये ‘पार्किंग’विषयक मोड्युल सुरू करण्यात आले आहे. यामुळे वाहनचालकांना ते असतील, त्या परिसरातील ५०० मीटर आणि पाच कि.मी.च्या परिघातील महापालिकेचे व बेस्टचे वाहनतळ सहजपणे शोधता येणार आहे. विशेष म्हणजे, वाहन जिथे असेल, तिथून वाहनतळापर्यंतचा जाण्याचा रस्तादेखील या अ‍ॅपमध्ये वाहनचालकास दिसणार आहे.अ‍ॅपमधून असा घेता येणार शोधMCGM 27x7 हे अ‍ॅप ‘प्ले स्टोअर’वर मोफत उपलब्ध आहे. हे ‘अ‍ॅप’ नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करणेगरजेचे आहे, तर यापूर्वीच ‘इन्स्टॉल’ करण्यात आले असल्यास ते अ‍ॅप अपडेट करावे.अ‍ॅप मोबाइलमध्ये कार्यान्वित झाल्यानंतर वाहनचालक ज्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणच्या ५०० मीटर परिघातील आणि पाच कि.मी.च्या परिघातील वाहनताळाची ठिकाणे नकाशावर दिसतील.आपल्याला सोयीच्या असलेल्या ठिकाणावर क्लिक केल्यानंतर अपेक्षित वाहनतळाची संक्षिप्त माहिती दिसेल. वाहनतळाचा पत्ता, कामकाजाची वेळ, वाहनतळाची क्षमता माहितीचा यात समावेश असेल. वाहनतळ सशुल्क असल्यास किती कालावधीसाठी किती शुल्क आकारले जाईल? याचीही माहिती दिसेल.याच पानावर तळाशी असलेल्या ‘डायरेक्शन’ या ‘लिंक’वर क्लिक केल्यानंतर वाहनचालकाला वाहनतळापर्यंत जाण्याचे ‘दिशानिर्देश’देखील मिळणार आहेत, ज्यामुळे वाहनतळापर्यंत पोहोचणे सुकर होणार आहे.

टॅग्स :पार्किंगमुंबई महानगरपालिका