Join us

दिंडोशीत हॉटेल मालकांच्या गच्चीवर अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर पालिकेचा हातोडा, पी दक्षिण विभागाची कारवाई

By मनोहर कुंभेजकर | Updated: February 1, 2023 19:38 IST

दिंडोशीत हॉटेल मालकांच्या गच्चीवर अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर पालिकेने कारवाई केली.

मुंबई : गोरेगाव मुलुंड लिंक रोड, दिंडोशी येथे रस्ता रुंदीकरण नावाने शांगाय आणि क्लासिक हॉटेल मालकांनी गच्चीवर अनधिकृत पणे रूफटॉप  हॉटेल्स सूरू कली होती. गेली अनेक वर्षे बिनधास्तपणे हा व्यवसाय अनधिकृत पणे सुरु होता. परिमंडळ ४ चे उपायुक्त  विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शना खाली पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त  राजेश अक्रे यांच्या नेतृत्वाखाली सदर बांधकामे निष्कासित केली गेली.

 गेली दोन दिवस सर्व अनधिकृत बांधकामे, पी दक्षिण विभाग इमारत व कारखाने खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर हॉटेल मालकांची गच्चीवर अनधिकृतपणे असलेली रूफटॉप हॉटेल्सवर हातोडा मारला अशी माहिती राजेश अक्रे यांनी दिली.

 

टॅग्स :मुंबईदिंडोशीगोरेगाव