Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा भाडे संकलक गजाआड

By admin | Updated: September 8, 2015 02:48 IST

शिवडीतील मदरशाच्या अध्यक्षाकडून ५० हजार रुपयांची लाच मागून २५ हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारताना भाडे संकलक संजय कांबळे याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक

मुंबई : शिवडीतील मदरशाच्या अध्यक्षाकडून ५० हजार रुपयांची लाच मागून २५ हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारताना भाडे संकलक संजय कांबळे याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. मदरशाची जागा शिवडी पीपल्स वेल्फेअर सोसायटीच्या नावे होती. पालिकेने घेतलेल्या आढाव्यात या संस्थेची मान्यता रद्द केली. त्यानंतर मदरशाचे अध्यक्ष पुरावे घेऊन पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात गेले. तेथे कांबळेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे १ लाख रुपयांची लाच मागितली. पुढे ५० हजार स्वीकारण्याचे मान्य केले.