Join us
Daily Top 2Weekly Top 5

बर्फाच्या कारखान्यांवर महापालिकेचे छापे

By admin | Updated: June 14, 2016 03:43 IST

मुंबईत शीतपेय, फळांचे रस तसेच गोळ्यासाठी वापरण्यात येणारा बर्फामध्ये ई-कोलाय विषाणू आढळल्यानंतर पालिकेने बर्फाच्या कारखान्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे़ यापैकी चार

मुंबई : मुंबईत शीतपेय, फळांचे रस तसेच गोळ्यासाठी वापरण्यात येणारा बर्फामध्ये ई-कोलाय विषाणू आढळल्यानंतर पालिकेने बर्फाच्या कारखान्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे़ यापैकी चार कारखान्यांवर न्यायालयीन कारवाई सुरू आहे़ तर एका कारखान्यातील सामान जप्त करण्यात आले आहे़ उष्णतेमुळे हैराण मुंबईकरांच्या शीत पेय व बर्फाच्या गोळ््यांवर उड्या पडू लागल्या आहेत़ मात्र रस्त्यावरच्याच नव्हे तर हॉटेलमध्ये विकण्यात येणाऱ्या थंड पेय व बर्फाच्या गोळ्यात वापरण्यात येणारे पाणी दूषित असल्याचे उजेडात आले आहे़ अशा काही ठिकाणांहून पाण्याचे नमुने पालिकेने तपासणीसाठी पाठविले असता त्यात ९२ टक्के ई-कोलाय विषाणू आढळले आहेत़ याचे तीव्र पडसाद आरोग्य समितीच्या बैठकीत आज उमटले़ याबाबत माहिती देताना प्रशासनाने सांगितले की, मुंबईतील १३ बर्फाच्या कारखान्यांवर छापे टाकण्यात आले़ मुंबईकारांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या पाच कारखान्यांना न्यायालयीन नोटीस पाठविण्यात आली आहे़ मालाड येथील शकुंतला या कारखान्यामधील सर्व सामान जप्त करण्यात आले़ (प्रतिनिधी)