मुंबई : पालिका कर्मचा:यांसाठी म्हाडाच्या गृहप्रकल्पांमध्ये कोटा राखून ठेवण्याची मागणी म्हाडाने मान्य केली आह़े याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी पालिकेला पत्रद्वारे कळविले आह़े याचा लाभ सव्वा लाख कर्मचा:यांना मिळणार आह़े
म्हाडामार्फत लॉटरी पद्धतीने सदनिकांचे वाटप केले जात़े यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी, माजी सैनिक तसेच पत्रकारांनाही आरक्षण दिले जात़े त्याप्रमाणो पालिकेचे अधिकारी आणि कर्मचा:यांनाही आरक्षण देण्याची मागणी गेल्या वर्षी तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांच्यामार्फत
राज्य सरकारकडे करण्यात आली होती़ ही मागणी राज्य सरकारने
अखेर मान्य केली आह़े म्हाडा अधिनियम 1981 मधील नियम 13(1) मध्ये या आरक्षणासाठी बदल
करावी लागणार आह़े याबाबतचा प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाच्या
बैठकीत सादर केला जाणार
आह़े (प्रतिनिधी)