मुंबई : जुन्या रुग्णवाहिका भंगारात निघाल्यानंतर नवीन वाहने विकत न घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आह़े त्यामुळे अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्य सरकारच्या रुग्णवाहिका सेवेवरच आता महापालिकेची मदार असणार आह़े याचा फटका गरजू रुग्णांना बसण्याची दाट शक्यता आह़े
महापालिका रुग्णवाहिकांच्या दररोज विविध रुग्णालयांमध्ये 136 फे:या होतात़ 75 रुग्णवाहिकांपैकी 31 रुग्णवाहिकांची वयोमर्यादा संपल्यामुळे प्रशासनाने नवीन रुग्णवाहिका खरेदीसाठी निविदा मागविल्या होत्या़ मात्र त्याच
काळात राज्य सरकारने नवीन रुग्णवाहिका सेवा सुरू केल्यामुळे महापालिकेने आता आपला निर्णय रद्द केला आह़े
प्रशासनाच्या या निर्णयामुळे रुग्णांची गैरसोय होईल, असे नगरसेवकांचे म्हणणो आह़े राज्य सरकारच्या केवळ 5क् रुग्णवाहिकाच मुंबईला मिळाल्या आहेत़ त्यामुळे सरकारी रुग्णवाहिकेवर अवलंबून राहण्याऐवजी महापालिकेने स्वत:च्या रुग्णवाहिका खरेदी कराव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली आह़े (प्रतिनिधी)
राज्य सरकारच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत
1क्8 या क्रमांकाद्वारे रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात येणार आह़े राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शहराला
7क् रुग्णवाहिका देण्याची तयारी शासनाने दाखविली आह़े