Join us  

राजकीय जाहिरातबाजीला महापालिकेचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 1:37 AM

राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहेत.

मुंबई : राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहेत. सभा, प्रभातफेरी आणि दारोदारी मतदारांना भेटून सुरू असलेल्या प्रचाराने जोर धरला आहे. तरीही मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी होर्डिंग्ज हेच प्रभावी माध्यम ठरत आहे. आचारसंहितेच्या काळात होर्डिंग्जवर बंदी असल्याने गेल्या महिन्याभरात महापालिकेने तब्बल ८६०० अशा जाहिरातींचे फलक खाली उतरविले आहेत. यामध्ये प्रामुख्याने राजकीय पक्षांच्या फलकांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे ऐन निवडणुकीत राजकीय पक्षांना चांगलाच फटका बसला आहे़उच्च न्यायालयाने होर्डिंग्जप्रकरणी अनेक वेळा फटकारल्यानंतर महापालिकेने २०१६ मध्ये नवीन धोरण आणले. मात्र या धोरणात राजकीय जाहिरातबाजीवर निर्बंध आणण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ११ मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर महापालिकेने बेकायदा होर्डिंग्जविरोधातील कारवाई तीव्र केली. पहिल्या आठवड्यात राजकीय होर्डिंग्ज, झेंडे याचे प्रमाण सर्वाधिक होते. यामध्ये नवीन विकासकामाची घोषणा, कामाचे उद्घाटन, भूमिपूजन जाहीर करून त्याचे श्रेय राजकीय पक्षांनी घेतल्याचे दिसून येते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून कारवाईच्या भीतीने राजकीय होर्डिंग्जचे प्रमाण फार कमी असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले. तरीही ही कारवाई निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतरही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.>पोलिसांकडे ४४ तक्रारींची नोंद>सार्वजनिक ठिकाणाहून काढलेले एकूण होर्डिंग्ज - ८६५७पोस्टर्स - १३७८बॅनर्स - २१२२भिंतीवर लिहिलेल्या जाहिराती -८७६अन्य साहित्य - ४१९१पोलिसांकडे तक्रार - ४४>सर्वाधिक होर्डिंग्ज काढलेले विभागभायखळा - ११०२गोरेगाव, मालाड - ११२६चेंबूर - ७९८, मालाड, मालवणी - ६७६जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत पालिकेने ११ हजार २०२ होर्डिंग्जवर कारवाई केली आहे. यात सर्वाधिक ६५३५ होर्डिंग्ज हे राजकीय पक्ष-नेत्यांचे आहेत.राजकीय नेत्यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे आदी कार्यक्रमांच्या जाहिरातीही विनापरवानगी लावल्या जातात. कारवाईत १८७५ व्यावसायिक तर २७९२ हे इतर बॅनर होते. याबाबत २२९५ जणांवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ६४० जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019