नवी मुंबई : वाशी गावाठाण परिसरात साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडावर उभारलेल्या अनधिकृत चाळीवर सिडकोच्या वतीने आज कारवाई करण्यात आली. तीन चाळीतील जवळपास पंचवीस ते तीस घरे या कारवाईत पाडून टाकण्यात आली.विशेष म्हणजे यापूर्वी सुध्दा या चाळींवर कारवाई करण्यात आली होती. सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी पुन्हा या बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या.पोलीस बंदोबस्तात आणि पालिकेच्या सहकार्यानेही ही कारवाई केल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
वाशी गावातील अनधिकृत चाळीवर पालिकेची कारवाई
By admin | Updated: February 12, 2015 01:01 IST