Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत हम साथ साथ

By admin | Updated: April 24, 2015 02:53 IST

महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत आठ दाम्पत्यांनी विजय मिळविला आहे. यात शिवसेनेच्या चार तर राष्ट्रवादीच्या तीन जोडप्यांचा समावेश आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत आठ दाम्पत्यांनी विजय मिळविला आहे. यात शिवसेनेच्या चार तर राष्ट्रवादीच्या तीन जोडप्यांचा समावेश आहे.कोपरखैरणे विभागातून शिवसेनेचे शिवराम पाटील व त्यांच्या पत्नी अनिता पाटील विजयी झाल्या आहेत. तसेच ऐरोलीतील प्रभाग क्रमांक १८ आणि १६ मधून अनुक्रमे शिवसेनेचे मनोहर मढवी आणि त्यांच्या पत्नी विनया मढवी विजयी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे दिघ्यातील प्रभाग क्रमांक २ आणि ५ मधून अनुक्रमे शुभांगी जगदीश गवंते आणि जगदीश नाना गवते हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. तर सानपाड्यातील प्रभाग क्रमांक ७४ व ७५ मधून शिवसेनेचे सोमनाथ वास्कर आणि त्यांच्या पत्नी कोमल वास्कर विजयी ठरल्या आहेत. दिघा प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादीचे नवीन गवते तर प्रभाग क्रमांक ३ मधून अ‍ॅड. अपर्णा नवीन गवते या विजयी ठरल्या आहेत. तळवली प्रभाग क्रमांक २७ मधून राष्ट्रवादीचे लक्ष्मीकांत पाटील तर प्रभाग क्रमांक २८ मधून त्यांच्या पत्नी मोनिका पाटील विजयी झाल्या आहेत. तसेच तुर्भे स्टोअरमधून सुरेश कुलकर्णी आणि आंबेडकरनगरमधून राधा सुरेश कुलकर्णी विजयी झाले आहेत. तर रबालेतून सुधाकर सोनवणे आणि रंजना सोनवणे विजयी झाले आहेत. (प्रतिनिधी)