Join us

शौचालयांचे सांडपाणी वस्तीमध्ये तरी महापालिका निवांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:06 IST

मुंबई : मालाड येथील आंबेडकरनगर आशेवर असताना महापालिका मात्र निवांत झोपण्याचे सोंग करत आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून सतत ...

मुंबई : मालाड येथील आंबेडकरनगर आशेवर असताना महापालिका मात्र निवांत झोपण्याचे सोंग करत आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाठपुरावा करूनदेखील येथील वस्तीमधील लोकांच्या घरात शौचालयाचे पाणी जात आहे.

येथील वस्तीच्या महिला, तरुण मुली, युवक, माणसे शौचास उघड्यावर जात असल्यामुळे २०१६ साली वस्तीमध्ये वस्ती शौचालय बांधले गेले. एवढे करूनदेखील येथील शौचालयाच्या टाक्या साफ होण्याबाबत काहीच कारवाई होत नाही. येथील सफाई करण्यासाठी महापालिका पैसे मागत आहे. प्रत्येक वेळी लोकांना पैसे देणे शक्य होत नाही. परिणामी सम्यकचे कार्यकर्ते यांनी महापालिकेच्या अधिकारी वर्गाची भेट घेतली. हा प्रकार लक्षात आणून दिला. त्यामुळे शौचालयाच्या टाक्या साफ होऊ लागल्या.

मात्र आता डिसेंबर महिन्यापासून वस्तीमध्ये गाड्या येणे बंद झाले आहे. पुन्हा सम्यकने आमच्या वस्तीच्या शौचालयांची टाकी रिकामी करावी, अशी तक्रार दिली. तरी आजपर्यंत काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यांनी पत्राचा पाठपुरावा केला. त्या नंतर हेल्पलाइन नंबरवर कॉल केले. तरीदेखील महापालिकेचा पी उत्तर विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. आता जर ही समस्या सोडविली नाही तर सम्यक म्हणून रस्त्यांवर येऊ, असे सम्यकचे संचालक योगेश बोले यांनी सांगितले.