Join us

स्मार्ट सिटी स्पर्धेत पालिकेचा सहभाग

By admin | Updated: July 12, 2015 00:43 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी व अमृत योजनेच्या प्रकल्पांमध्ये महापालिका सहभाग घेणार आहे. स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी व अमृत योजनेच्या प्रकल्पांमध्ये महापालिका सहभाग घेणार आहे. स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा शहरांची निवड करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करून तो केंद्र शासनाच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या आंतरराज्यातील स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये सादर केला जाणार आहे. महापालिकेस स्मार्ट सिटी अंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीकरिता प्रतिवर्षी ५० कोटी इतका निधी स्वहिस्सा म्हणून उभा करावा लागणार आहे. पाच वर्षे कालावधीकरिता प्रतिवर्ष २०० कोटी इतका निधी खर्च करू शकेल याबाबत पालिकेच्या कार्यकारी क्षमतेचा व नियोजनाचा तपशील सादर करावयाचा आहे. यामध्ये नागरिकांच्या सहभागाबाबतही नियोजन करावयाचे आहे. अमृत योजनेमध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा व्यवस्थापन, मलनि:सारण, पावसाळी गटर योजना, शहर परिवहन व इतर बाबींचा समावेश आहे. एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५०० शहरांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास आज मंजुरी दिली.