Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका उपायुक्तांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण

By admin | Updated: July 3, 2015 02:08 IST

कामात कुचराई करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याला उपायुक्ताकडूनच मारहाण होण्याची घटना बोरीवली विभाग कार्यालयात आज घडली़ पश्चिम द्रुतगती महामार्गावर दगडमातीचा ढिगारा पाहून उपायुक्त

मुंबई : कामात कुचराई करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याला उपायुक्ताकडूनच मारहाण होण्याची घटना बोरीवली विभाग कार्यालयात आज घडली़ पश्चिम द्रुतगती महामार्गावर दगडमातीचा ढिगारा पाहून उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी साहाय्यक अभियंत्याला मारहाण करीत साहाय्यक आयुक्तांचाही अवमान केला़ यामुळे संतप्त कर्मचारी उद्या ढाकणे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कांदिवली येथील पालिकेच्या विभाग कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत़ पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज दुपारी पाहणीसाठी गेलेले उपायुक्त ढाकणे यांना बन्सी नगर मस्जिदसमोर पेव्हर ब्लॉक व मातीचा ढिगारा दिसून आला़ याबाबत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कनिष्ठ अवेक्षक विजय मानकर यांना त्यांनी जाब विचारला़ मात्र एवढ्यावरच न थांबता उपायुक्त ढाकणे यांनी मानकर यांच्या श्रीमुखात भडकावली व साहाय्यक अभियंता रमेश चौबे यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते़ आर मध्य विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांचाही त्यांनी अवमान केला़ ही माहिती बोरीवली आर-मध्य विभाग कार्यालयापर्यंत पोहोचताच कामगार संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारले़ हे कर्मचारी उद्या सकाळी ११ वाजता कांदिवली येथील आर दक्षिण विभाग कार्यालयासमोर ढाकणे यांच्याविरोधात निदर्शने करणार आहेत. (प्रतिनिधी)कारवाई करणाऱ्या दुय्यम अभियंत्याला मारहाणअंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर तनिष्का शोरूमसमोरील पदपथावरील बेकायदा शेड तोडण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला स्थानिकाने मारहाण केली़ या मारहाणीत के पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता राजेंद्र माकणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ त्यांच्यावर पालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़