Join us

महापालिकेच्या सहाय्यकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST

महापालिकेच्या सहाय्यकला१० हजारांची लाच घेताना अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - ड्रेनेजच्या सफाईसाठी रस्ता खाेदाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी ...

महापालिकेच्या सहाय्यकला

१० हजारांची लाच घेताना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - ड्रेनेजच्या सफाईसाठी रस्ता खाेदाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या महापालिकेच्या मलनिसारण विभागाच्या एका मलनिसारण सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली.

संभाजी मल्हारी देवकाते (वय ४२) असे त्याचे नाव आहे. महापालिकेच्या दादरमधील जी उत्तर विभागात तो कार्यरत होता.

धारावी परिसरात राहत असलेल्या एका नागरिकाला घरातील सांडपाणी तुंबत असल्याने ड्रेनेज दुरुस्ती करण्यासाठी रस्ता खाेदाई करण्यासाठी महापालिकेच्या जी विभागात अर्ज केला होता, त्याला मंजुरी देण्यासाठी मलनिसारण सहाय्यक संभाजी देवकातेने १० हजार रुपयांची मागणी केली. नागरिकाने त्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने सापळा रचून देवकातेला तक्रारदाराकडून पैसे घेत असताना रंगेहाथ पकडले.