Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘खड्डे भरो’साठी महापालिकेचे अ‍ॅप

By admin | Updated: June 25, 2015 00:41 IST

रस्त्यांवर खड्डे पडले असतील आणि पालिकेचे त्याकडे लक्ष नसेल तर त्यातूनच प्रवास करायची वेळ यापूर्वी ठाणेकरांवर येत होती. परंतु, यंदा शहरात फारशा प्रमाणात खड्डे

अजित मांडके, ठाणेरस्त्यांवर खड्डे पडले असतील आणि पालिकेचे त्याकडे लक्ष नसेल तर त्यातूनच प्रवास करायची वेळ यापूर्वी ठाणेकरांवर येत होती. परंतु, यंदा शहरात फारशा प्रमाणात खड्डे नसल्याने ठाणेकरांवर तशी वेळ सध्या तरी ओढवली नाही. विशेष म्हणजे खड्ड्यांचा रोज सर्व्हे करून ते तत्काळ बुजविण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतल्यानंतर त्यापुढेही जाऊन ठाणेकरांना जर एखाद्या भागात रस्त्यावर खड्डा आढळल्यास त्याची माहिती आता स्मार्ट फोनवर एक क्लिक दाबून एका क्षणात प्रशासनास कळविण्याची संधी पालिकेने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी पालिकेने ‘स्टारग्रेड’ नावाचे अ‍ॅप तयार केले असून लवकरच ते ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे. अ‍ॅपवर आलेल्या या तक्रारींची दखल तत्काळ घेऊन खड्ड्यांचे स्वरूप पाहून ते २४ ते ३६ तासांत बुजविणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.