मुंबई : पालिकेने दोन दिवस के/पश्चिम व एच/पश्चिम विभागांमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. यामध्ये ज्या स्टॉलधारकांनी त्यांना मंजूर असलेल्या क्षेत्रफळापेक्षा अधिक जागा व्यापून केलेले अतिक्रमण हटविले. या अंतर्गत एच/पश्चिम विभागामध्ये २५२ स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली, तर के/पश्चिम विभागामध्ये १५४ स्टॉल्सवर कारवाई केली. अतिरिक्त बांधकाम, मंजूर जागेबाहेर बांबू-ताडपत्री-सिमेंटचे पत्रे लावून केलेले अतिक्रमण हटविले आहे. त्याचबरोबर स्टॉल्सच्या समोरील बाजूस झडपा, प्रोजेक्शन बाहेर काढलेले होते, त्यावरही कारवाई करण्यात आली. कारवाईत जप्त केलेले साहित्य महापालिकेच्या गोदामात जमा करण्यात आले आहे.
४०६ स्टॉल्सवर पालिकेची कारवाई
By admin | Updated: December 4, 2015 02:04 IST