Join us

अनधिकृत पार्किंग करणाऱ्या ८० वाहनांवर पालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 06:38 IST

दहा ठिकाणी मोफत पार्किंग : दोन दिवसांत साडेतीन लाखांची दंड वसुली

मुंबई : रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीच्या मार्गात अडथळा निर्माण करणाºया वाहन चालकांना कारवाईचा बडगा दाखविण्यास पालिका प्रशासनाने रविवारपासून सुरुवात केली आहे. या मोहिमेंतर्गत सोमवारी ८० वाहन चालकांकडून अनधिकृत पार्किंग केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला. दिवसभरात एक लाख ७० हजार ३४० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईतील अनधिकृत पार्किंगला आळा बसावा, यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वाहनतळालगतच्या ५०० मीटरच्या परिसरातील वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार अवजड वाहनाला १५ हजार, मध्यम आकाराच्या वाहनांवर ११ हजार, कार-जीपवर १० हजार रुपये, रिक्षा, तीन चाकींवर आठ हजार, तर अनधिकृतपणे ‘पार्क’ केलेल्या दुचाकी वाहनांवर किमान पाच हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे.

पालिकेने सुरू केलेल्या या कारवाईच्या पाहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी ५६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत पालिकेकडून एक लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर सोमवारी दिवसभरात ३५ चार चाकी, तीन चाकी ३ व ४२ दुचाकी यानुसार एकूण ८० वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एक लाख ७० हजार ३४० एवढी रक्कम दंड स्वरूपात जमा झाली. तर दोन दिवसांत तीन लाख ५० हजार ३४० रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे.वाहनचालकांसाठी दहा ठिकाणी मोफत पार्किंगअनधिकृत ठिकाणी पार्किंग केल्यास आता पालिकेने त्यावर कारवाईचे बडगा उगारला आहे. तर, अनेक ठिकाणी जागेअभावी पार्किंग कराची तरी कुठे, असा वाहनचालकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतआहे.दुसरीकडे सार्वजनिक वाहनतळांवर ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे ठेकेदार नियुक्त होईपर्यंत हे पार्किंग मोफत असून एकूण दहा ठिकाणी मोफत पार्किंग उपलआहे.‘आर दक्षिण’ विभागातील कांदिवली पूर्व परिसरात असलेल्या महापालिकेच्या एका ‘अ‍ॅमिनिटी पार्किंग’चा समावेश या यादीत करण्यात आल्यामुळे एकूण वाहनतळांची संख्या ही २७ एवढी झाली आहे.