Join us

मुंब्य्रात चिमुरडीचा मृत्यू डेंग्यूने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:52 IST

डेंग्यूसदृष आजाराने मुंब्य्रात साडे तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. येथील अमृत नगर भागातील सहारा अपार्टमेंट येथे राहणा-या सायमा अन्सारी या चिमुरडीला २५ जुलै रोजी श्वसनाचा त्रास जाणवू लागला.

मुंब्रा : डेंग्यूसदृष आजाराने मुंब्य्रात साडे तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. येथील अमृत नगर भागातील सहारा अपार्टमेंट येथे राहणा-या सायमा अन्सारी या चिमुरडीला २५ जुलै रोजी श्वसनाचा त्रास जाणवू लागला. कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात तिला दाखल केले. तेथे उपचारादरम्यान सोमवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.डेंग्यूने तिचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घटनेनंतर ती रहात असलेल्या परीसरात औषध फवारणी केल्याचे नगरसेवक जफर नोमानी यांनी सांगितले. ती निष्प्रभ ठरल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.