मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. स्वबळावर पालिका काबीज करण्याची भाषा करणाऱ्या भाजपाने नव्या कार्यकारिणीत अन्य पक्षांतून आलेल्या आयारामांसह सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन दशकांहून अधिक काळ युतीच्या माध्यमातून महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना आणि भाजपात यंदा मात्र वितुष्ट निर्माण झाले आहे. युतीचे नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत स्वबळाचे नारे देत असले तरी महापालिकेपासून केंद्रापर्यंत असलेली युती मात्र तोडण्यात आली नाही. स्थानिक नेते स्वबळाची भाषा करीत असले तरी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र युतीच्या बाजूने संकेत देत आहेत. नव्या कार्यकारिणीत स्वबळाची भाषा करणाऱ्या नेते, पदाधिकाऱ्यांचा वरचष्मा असून नव्याने भाजपात दाखल झालेल्यांनाही स्थान देण्यात आले आहे. जाणीवपूर्वक सर्वभाषिक, सामाजिक आणि धार्मिक घटकांना पदे देण्यात आली आहेत.
मुंबई भाजपाचा सर्वव्यापी अजेंडा
By admin | Updated: November 15, 2016 05:08 IST