Join us

मुंबईचे तापमान पुन्हा 34 अंशांवर

By admin | Updated: October 30, 2014 01:12 IST

अरबी समुद्रात निर्माण झालेले निलोफर चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत असतानाच हिवाळ्याच्या तोंडावर मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात येत आहे.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले निलोफर चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत असतानाच हिवाळ्याच्या तोंडावर मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात येत आहे. बुधवारी कमाल आणि किमान तापमानात हा फरक तब्बल 13 अंशांचा नोंदविण्यात आला असून, सरासरी हा फरक 6 अंशांचा नोंदविण्यात येतो. दरम्यान, आता पुन्हा तापमान  34 अंशांवर पोहोचल्याने मुंबईकरांना पुन्हा उकाडा सहन करावा लागत आहे.
मुंबईकरांना धडकी भरविणारे निलोफर चक्रीवादळ मुंबईपासून दूर गेले असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलोफर आता आणखी उत्तरेकडे सरकले आहे. आता त्याचा केंद्रबिंदू नलियापासून (गुजरात) पश्चिम नैर्ऋत्य दिशेस 87क् किमी आणि कराचीपासून (पाकिस्तान) दक्षिण-नैर्ऋत्य दिशेस 87क् किमी अंतरावर आहे. तर दुसरीकडे निलोफरचा प्रभाव म्हणून हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला अंदाज तूर्तास फोल ठरला असून, मुंबईचे कमाल तापमान 34 अंशांच्या घरात नोंदविण्यात येत आहे. शिवाय किमान तापमान 21 अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मुंबईचे कमाल तापमान तब्बल 7 अंशांनी खाली घसरले होते. (प्रतिनिधी)
 
राज्य अंदाज : कोकणात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात 
हवामान कोरडे राहील.
पुणो अंदाज : दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहील.
मुंबई अंदाज : आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35, 22 अंश राहील.