Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे तापमान ३६ अंशावर...

By admin | Updated: March 21, 2016 03:06 IST

मुंबईसाठी अंदाज२१ आणि २२ मार्च : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २२ अंशाच्या आसपास राहील.

मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत असून, वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. रविवारी शहराचे कमाल तापमान पुन्हा ३६.९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३६.५ अंश नोंदविण्यात आले होते. दुसरीकडे राज्यातील शहरांच्या कमाल तापमानाचा पाराही चढाच असून, २४ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.