मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र विरल्यानंतर हवामानात उल्लेखनीय बदल होऊ लागले आहेत. मुंबईचे किमान तापमान १९ अंशावर घसरले असून, गारव्यात किंचितशी वाढ झाली आहे.पाऊस आणि हवामानातील बदलामुळे मुंबईच्या तापमानात चढ-उतार नोंदविण्यात आले होते. आर्द्रता व ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली होती. मात्र, आता तापमानात घसरण झाली असून, कमाल आणि किमान तापमान ३२, १९ अंशावर आले आहे. रात्रीच्या गारव्यात वाढ झाली आहे.३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ डिसेंबर रोजी राज्यात हवामान कोरडे राहील. तर पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २२ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.
मुंबईचे तापमान १९ अंशावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2015 02:51 IST