Join us  

मुंबईच्या निकालात १९.६८ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 6:14 AM

पाच वर्षांतील दहावीचा सर्वाधिक निकाल : १ लाख ८ हजार विद्यार्थ्यांना मिळाले ७५ टक्क्यांहून अधिक गुण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा यंदाचा मुंबई विभागाचा निकाल ९६.७२ टक्के लागला असून, मागील ५ वर्षांतील हा सर्वाधिक निकाल आहे. मागील वर्षी मुंबई विभागाचा निकाल ७७.०४ टक्के होता, त्यात यंदा १९.६८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुंबईत दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ३७७४ शाळा होत्या, त्यापैकी १७१४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. राज्य शिक्षण मंडळाच्या ९ विभागीय मंडळांत मुंबई विभाग यंदा चौथ्या स्थानावर आहे. मागील वर्षी तो पाचव्या स्थानी होता. यंदा क्रमवारीत एकने सुधारणा झाली आहे.

पश्चिम मुंबईचा निकालसर्वाधिक, तर रायगडचानिकाल सर्वांत कमीमुंबईच्या निकालात रायगड, ठाणे, पालघर, बृहन्मुंबई (दक्षिण मुंबई), मुंबई उपनगर १ (पश्चिम मुंबई), मुंबई उपनगर २ (पूर्व मुंबई उपनगर) यांचा समावेश होतो. यामध्ये मुंबई उपनगर -१ चा निकाल सर्वाधिक म्हणजे ९७.३० टक्के लागला आहे. त्याखालोखाल बृहन्मुंबईचा निकाल ९७.१० इतका लागला आहे. मुंबई विभागात सर्वाधिक कमी निकाल रायगड जिल्ह्याचा लागला असून रायगड जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९६.०७ आहे.

मुंबईतही मुलींची बाजीमुंबई विभागातून यंदा ३ लाख ३१ हजार १३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३ लाख २० हजार २८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.परीक्षेस बसलेल्या एकूण मुलांपैकी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६३ हजार ४४६ आहे तर उत्तीर्ण विद्यार्थिनींची संख्या १ लाख ५६ हजार ८३८ आहे.मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७७, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.७३ टक्के आहे. यामुळे साहजिकच यंदाही राज्याप्रमाणेच मुंबई विभागातही मुलींनीच बाजी मारली आहे.७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८ हजार ४९ एवढी आहे.प्रावीण्यासह विशेष श्रेणी व ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या राज्यात मुंबई विभागात सर्वाधिक म्हणजे १ लाख ८ हजार ४९ इतकी आहे. ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १७ हजार ८१९, तर ३५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या १९ हजार ५५३ इतकी आहे.० ते १० टक्के निकालाच्या तीन शाळामुंबई विभागात एकूण ३ हजार ७७४ शाळा आहेत. त्यापैकी तब्बल १७१४ शाळांचा निकाल यंदा १०० टक्के लागला.० ते १० टक्के निकालाच्या ३ शाळा, तर १० ते २० आणि २० ते ३० टक्के निकालाच्या अनुक्रमे १ व ४ शाळा आहेत. ७० ते ८० टक्के निकालाच्या १४०, तर ८० ते ९० टक्के निकालाच्या ३७७ शाळा आहेत.72.45% निकालपुनर्परीक्षार्थींचायंदा मुंबई विभागातून ५८ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी दहावीची पुनर्परीक्षा दिली. त्यातील ४२ हजार ५७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाचा निकाल ७२.४५ टक्के आहे. यामध्ये ७०२ विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळाले. प्रथम श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार ९९१ असून,८ हजार ७८३ विद्यार्थीद्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.भूगोलाने तारले, समाजशास्त्राचा निकाल 99.99%कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीच्या परीक्षेतील भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार, इतर विषयांतील सरासरी गुणांइतकेच गुण भूगोल विषयाला देण्याचा निर्णयही राज्य मंडळाकडून घेण्यात आला व त्याची अंमलबजावणी झाली. यंदाच्या दहावीच्या निकालात अंतर्गत गुण आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या गुणांचा प्रभाव साहजिकच भूगोलाच्या गुणांवरही झाला. त्यामुळे मुंबई विभागाचा समाजशास्त्र विषयाचा यंदाचा निकाल ९९.९९ टक्के इतका लागला.मराठीही सुधारले; मागील वर्षापेक्षा निकालात २० टक्क्यांची वाढमुंबई विभागात मराठीच्या निकालात यंदा त्यात २० टक्क्यांनी वाढ झाली. मराठीचा निकाल ९६.२० टक्के लागला. विद्यार्थ्यांची आकलनशक्ती आणि स्वविचार याला प्राधान्य देणाºया कृतिपत्रिकेवर आधारित यंदा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप होते. हिंदीचा निकाल ९४.६३ टक्के तर इंग्रजी विषयाचा निकाल ९७.५५% लागला.

टॅग्स :दहावीचा निकाल