Join us  

मुंबईत ‘स्वयं-पुनर्विकास अभियान’ची नांदी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 5:18 AM

-  मुंबईत गृहनिर्माण संस्थांनी स्वत:च पुनर्विकास करावा; तसेच मुंबई जिल्हा बँकेच्या स्वयं-पुनर्विकास योजनेला शासनाने स्वीकारावे, या हेतूने मुंबई जिल्हा बँकेने ‘स्वयं-पुनर्विकास अभियान’ परिषद आयोजित केली आहे.

मुंबई -  मुंबईत गृहनिर्माण संस्थांनी स्वत:च पुनर्विकास करावा; तसेच मुंबई जिल्हा बँकेच्या स्वयं-पुनर्विकास योजनेला शासनाने स्वीकारावे, या हेतूने मुंबई जिल्हा बँकेने ‘स्वयं-पुनर्विकास अभियान’ परिषद आयोजित केली आहे.मंत्रालयाशेजारी यशवंतराव चव्हाण केंद्रात सोमवारी, ८ जानेवारीला सकाळी १० ते २ या वेळेत पार पडणाºया या विशेष एक दिवसीय परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असेल. या परिषदेत मुंबईच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना स्वत:चा विकास स्वत: करण्यासाठी मुंबई बँकेकडून ‘स्वयं-पुनर्विकास योजने’अंतर्गत सर्व आर्थिक व तांत्रिक साहाय्य केले जात आहे. या योजनेचा स्वीकार शासनाने केल्यास स्वयं-पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळेल, अशी आशा बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. दरेकर म्हणाले की, बँकेची स्वयं-पुनर्विकास योजना ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या रूपात आणि अधिक लवचीकपणे राबविली जात आहे.चेंबूरच्या सहकार नगरातील चित्रा गृहनिर्माण संस्था स्वयं-पुनर्विकासाला गेली आणि रहिवाशांना तब्बल १ हजार ३०० चौरस फुटांची घरे आणि प्रत्येकी ३२ लाख रुपयांचा कॉर्पस फंड मिळाला आहे. हे प्रातिनिधिक उदाहरण पाहता, मुंबईतील गृहनिर्माण संस्थांसाठी ही परिषद दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरेल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.बँकेने आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री करतील. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची प्रमुख उपस्थिती असेल. या समारंभास मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, रेरा अध्यक्ष गौतम चॅटर्जी, मुंबई बँकेचे संचालक आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील राऊत, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर, बी. डी. पारले, म्हाडा प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर प्रभू, वास्तू विशारद निखिल दीक्षित उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमास मुंबईतील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी आणि बँकेचे सरव्यवस्थापक डी. एस. कदम यांनी केले आहे.

टॅग्स :घरमुंबई