Join us  

मुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 6:01 AM

मुंबईसह राज्याच्या वातावरणात प्रामुख्याने बदल नोंदविण्यात येत असून, सोमवारी मुंबईचे किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

मुंबई : मुंबईसह राज्याच्या वातावरणात प्रामुख्याने बदल नोंदविण्यात येत असून, सोमवारी मुंबईचे किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ८.१ अंश एवढे नोंदविण्यात आले आहे. मुंबईच्या किमान तापमानात तीन अंशाची वाढ नोंदविण्यात येत असतानाच वातावरणात होत असलेल्या बदलामुळे हवामान खात्याने विदर्भाला पावसाचा इशारा दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.२२ ते २३ जानेवारीदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २४ ते २५ जानेवारी दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. पुणे आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. मुंबईचे कमाल-किमान तापमान अनुक्रमे ३३, १७ अंशाच्या आसपास राहील; आणि आकाश सामान्यत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.>सोमवारी नोंदविण्यात आलेले किमान तापमानपुणे ११.६अहमदनगर ९.४जळगाव १२.६कोल्हापूर १६.८महाबळेश्वर १४.५मालेगाव १४.२नाशिक १२.३सांगली १२.४सातारा ११.५सोलापूर १४.९औरंगाबाद १३.0परभणी ११.0नांदेड १३.0बीड १६.४अकोला १२.५अमरावती १३.६बुलडाणा १६.0चंद्रपूर १३.0गोंदिया ९.६नागपूर ८.१वर्धा ११.१यवतमाळ १५.0