Join us

मुंबईचे किमान तापमान घसरले

By admin | Updated: January 9, 2015 02:00 IST

उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने विदर्भात आलेली थंडीची लाट कायम असून, आता मुंबईदेखील थंडावली आहे.

मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने विदर्भात आलेली थंडीची लाट कायम असून, आता मुंबईदेखील थंडावली आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, हे किमान तापमान बुधवारच्या तुलनेत ३ अंशांनी खाली घसरले आहे. बुधवारी मुंबईचा पारा १६ अंश सेल्सिअस एवढा नोंदविण्यात आला होता.पश्चिम बंगालवरील कमी दाबाचे क्षेत्र आणि अवकाळी पावसामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली होती; आणि मुंबईच्या किमान तापमानासह कमाल तापमानातही वाढ झाली होती. कमाल तापमान २८ अंशाहून ३१ अंशावर पोहोचले होते तर किमान तापमानदेखील १६ अंशाहून १८ अंशावर पोहोचले होते. आता कमाल आणि किमान तापमान उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पुन्हा खाली घसरले आहे. राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानात घसरण नोंदविण्यात आली आहे. मुंबईचे किमान तापमानदेखील ३ अंशानी खाली घसरले असून, मुंबईकरांना एका दिवसातच हुडहुडी भरली आहे. मुंबईचे किमान तापमान खालावल्याने रात्रीसह दिवसादेखील गारवा पडू लागला असून, पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.राज्यात सर्वांत कमी तापमान नाशिक येथे ७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान : गोव्यासह राज्यात हवामान कोरडे होते.किमान तापमान : विदर्भाच्या काही भागांत थंडीची लाट आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.राज्य अंदाज : गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहील.पुणे अंदाज : आकाश अंशत: ढगाळ राहील.मुंबई अंदाज : आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, १३ अंशाच्या आसपास राहील.राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्येपुणे १०.३, जळगाव ७.८, मालेगाव ९.७, नाशिक ७, उस्मानाबाद १०.९, औरंगाबाद ११.४, परभणी ११.८, नांदेड १०.५, अकोला ९.५, अमरावती ११.४, बुलढाणा १०.९, चंद्रपूर ११.९, नागपूर ८.७, यवतमाळ ९