Join us  

'रेल रोको'मुळे हजारो नोकरदारांना घडणार 'उपवास', डबेवाल्यांच्या सेवेलाही आंदोलनाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 10:40 AM

मुंबई - रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या मध्य रेल्वेवरील रेल रोकोचा मुंबईतील डबेवाल्यांच्या सेवेलाही फटका बसला आहे. डबेवाल्यांच्या सेवेला फटका बसल्यानं हजारो नोकरदारांना आज 'उपवास' घडणार असल्याचं चित्र दिसत आहे. मध्य रेल्वेवर कल्याणपासून ते माटुंगापर्यंत सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसहीत मुंबईचे डबेवालेदेखील अडकले आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच )

मनसेचा आंदोलनाला पाठिंबा

रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान 'रेल रोको' केल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. आता या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही पाठिंबा दिल्यानं आंदोलन आणखी तीव्र झालंय. पण त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना, लाखो नोकरदारांना, महिला प्रवाशांना बसतोय. त्यामुळे आम्हाला वेठीस का धरता, असा सवाल अनेक चाकरमानी करत आहेत. तरुणांच्या मागण्यांबद्दल आम्हालाही सहानुभूती आहे, त्यांना न्याय मिळावा, नोकऱ्या मिळाव्यात हीच आमचीही भावना आहे, पण कुणाच्या तरी चुकीची शिक्षा ते आम्हाला देत आहेत, अशा भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :मुंबई रेल रोकोमुंबई डबेवाले