Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या अनुजा आचरेकर आणि कशिष खिमनानी यांनी अमेरीकेत फडकावला भारताचा पताका

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 1, 2025 15:36 IST

Mumbai News: बॅबसन कोलॅबोरेटिव्ह ग्लोबल स्टुडंट चॅलेंज या अमेरीकेतील  स्पर्धात्मक उपक्रमात मुंबईच्या अनुजा आचरेकर आणि कशिष खिमनानी यांनी दुसरा क्रमांक पटकावून भारताचा पताका अमेरिकेत फडकवण्यात यश मिळवले आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - बॅबसन कोलॅबोरेटिव्ह ग्लोबल स्टुडंट चॅलेंज या अमेरीकेतील  स्पर्धात्मक उपक्रमात मुंबईच्या अनुजा आचरेकर आणि कशिष खिमनानी यांनी दुसरा क्रमांक पटकावून भारताचा पताका अमेरिकेत फडकवण्यात यश मिळवले आहे.

या स्पर्धेत संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (संबंधित नव्या व्यावसायिक संकल्पना  मूर्त स्वरुपात आणण्याच्या शक्यतांची  तपासणी केली जाते. बॅबसन कोलॅबोरेटिव्ह २०२५ ग्लोबल स्टुडंट चॅलेंज (मास्टर्स चॅलेंज) मध्ये १० देशांतील ८ कोलॅबोरेटिव्ह सदस्य संस्थांमधील २७२ विद्यार्थी सहभागी झाले होते.  या स्पर्धेत  संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक उद्दिष्टांवर ( यूएन ग्लोबल गोल्स ) लक्ष केंद्रित करणारे एकूण ११४ प्रकल्प   सादर केले गेले.

अंतिम फेरीत फ्रान्स, चिली, नाॅर्वे, इक्वाडोर आणि भारत अशा पाच देशांतील स्पर्धकांमधे स्पर्धा होती. त्यात इक्वाडोरने प्रथम क्रमांक पटकावला तर *अनुजा आचरेकर आणि कशिश खेमचंदानी या भारतातील स्पर्धकांनी  दुसरे स्थान मिळवून नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे अशी माहिती मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनीदिली.

अनुजा आणि कशिष या दोघी नव उद्यमी, प्लास्टिकला पर्यायी आणि  तरुणाईला आकर्षित  करणाऱ्या कापडी पिशव्या  उत्पादन करुन  विक्री करतात. मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पंचायत पेठेतही  त्यांचा स्टॉल असतो.

त्यांनी सादर केलेल्या ५ मिनीटांच्या व्हिडिओ क्लिप मधे  प्लास्टिक निर्मुलनाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कोणती व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात कशी राबवली याचे सादरीकरण त्यांनी  केले आहे. या व्हिडिओ क्लिपच्या आधारे अनुजा आणि कशिष यांनी या जागतिक स्पर्धेत दुसरे मानाचे स्थान जागतिक  स्तरावर मिळवले आहे अशी माहिती देशपांडे यांनी दिली.

टॅग्स :मुंबई