Join us

मुंबईकरांसाठी खुशखबर, महिन्याभरात कोस्टल रोडला मिळणार मंजुरी

By admin | Updated: February 28, 2017 18:44 IST

महिन्याभरात कोस्टल रोडला सीआरझेड मंजुरी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 28 - नरिमन पॉइंट ते कांदिवली असा ३३ किलोमीटर कोस्टल रोड (सागरी मार्ग) तयार करण्याचा पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. पण आता पर्यावरण खात्याकडून याबावतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिन्याभरात कोस्टल रोडला सीआरझेड मंजुरी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी आज दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील मिनी विधानसभा निवडणुकीतील यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते, त्यानंतर त्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल दवे यांचीही भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सीआरझेडमध्ये येणाऱ्या झोपड्यांच्या पुनर्विकासावर चर्चा झाली. यापूर्वी झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी 61 आणि 49 चा फॉर्म्युला होता. पण एकही एसआरए स्कीम होऊ शकली नाही. तसंच नायर समितीच्या अहवालावर त्वरीत निर्णय घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी दवे यांच्याकडे केली.