Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार

By admin | Updated: January 13, 2015 19:28 IST

बेस्टने प्रवास करणा-या मुंबईकरांसाठी जानेवारीच्या पहिल्याच महिण्यात खिशाला चाट लावणारी बातमी आहे.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. १३ - बेस्टने प्रवास करणा-या मुंबईकरांसाठी जानेवारीच्या पहिल्याच महिण्यात खिशाला चाट लावणारी बातमी आहे. पुढील महिन्यापासून मुंबईकरांना बेस्टने प्रवास करायचा असेल तर १ रुपया अधिकचा मोजावा लागणार आहे. बेस्टच्या २ रुपये भाडेवाढीला मुंबई मनापाने मंजुरी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात १ रुपयाची वाढ होणार असून एप्रिल महिन्यात आणखी एक रुपयाची वाढ होणार असल्याने मुंबईकरांना हा अधिकचा भार सोसावा लागणार आहे. दरम्यान, मेट्रोच्या भाडेवाढ होवून काही दिवसांचा अवधी लोटला जात नाही तोच बेस्ट प्रवास महागणार असल्याने मुंबईकरांचा मेट्रो व बेस्ट असा दोन्ही आता महागला आहे.