Join us  

‘केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांचा अपेक्षाभंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 6:12 AM

मुंबईकरांचा अपेक्षाभंग झाल्याचे रेल यात्री परिषदचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

- कुलदीप घायवट मुंबई : नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असला तरी यात सरकारने मुंबईसाठी कोणत्याही नवीन प्रकल्पाची घोषणा केलेली नाही. फक्त रखडलेल्या प्रकल्पासाठीच तरतूद करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांचा अपेक्षाभंग झाल्याचे रेल यात्री परिषदचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.प्रश्न : मुंबई महानगर क्षेत्रातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील?उत्तर : मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा २, ३ आणि ३ अ साठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीचा वापर प्रत्यक्षात प्रकल्प उभा करण्यासाठी आवश्यक आहे. सीएसएमटी ते कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका, कल्याण ते कसारा तिसरी मार्गिका, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिका, विरार ते डहाणू चौपदरीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे.प्रश्न : मुंबईला अर्थसंकल्पातून स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे का?उत्तर : रेल्वेला मुंबईमुळे कोट्यवधींचा महसूल मिळतो. त्यामुळे मुंबईसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला मिळणारा निधी मुंबईव्यतिरिक्त अन्य विभागांना पुरविला जातो. त्यामुळे प्रवाशांच्या तुलनेने मुंबईच्या वाट्याला कमी निधी येतो. यासह मुंबईतील पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्ग मिळून ‘मुंबई झोन’ बनविणे आवश्यक आहे. या झोनसाठी एका महाव्यवस्थापकाची नियुक्ती केली पाहिजे.प्रश्न : लोकलमधील गर्दीच्या नियोजनासाठी काय केले पाहिजे?उत्तर : रेल्वे अपघात रोखण्यासाठी रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दीचे प्रमाण कमी होईल. यासह मुंबईवर लोकसंख्येचा ताण वाढला आहे. मुंबईतील गर्दी नवी मुंबईकडे स्थलांतरित झाली आहे. यासह ठाणे, कल्याण येथे गर्दी स्थिरावल्यास लोकलमध्ये लटकून प्रवास करणे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.>...तरच बिघाडाची मालिका थांबेलमेगाब्लॉक घेऊनसुद्धा दररोज रेल्वे रुळाला तडे, ओव्हरहेड वायर तुटणे अशा घटना घडतात. यासाठी दररोज रूळ आणि ओव्हरहेड वायरची देखभाल केली पाहिजे. तरच लोकल मार्गातील बिघाडांची मालिका थांबेल. पादचारी पूल बनविल्यानंतर विशिष्ट कालावधीनंतर तपासणी केली पाहिजे.पर्यायी वाहतूक व्यवस्था गरजेचीलोकल प्रवासात गर्दीचे प्रमाण प्रचंड आहे. गर्दीमुळे अपघात होऊन दररोज ८ ते १२ प्रवाशांचा मृत्यू होतो. त्यामुळे रेल्वेला पर्यायी व्यवस्था असणे आवश्यक आहे. मेट्रो, मोनो किंवा इतर पर्यायी सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून द्यायला हव्यात. खासगी क्षेत्रातील कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करणे आवश्यक आहे.>रुळांसह ओव्हरहेड वायरची देखभाल दररोज केली तरच लोकल मार्गातील बिघाडाचीमालिका थांबेल. - सुभाष गुप्ता