Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचा जागरूक मुंबईकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:22 IST

पुलाच्या दैनावस्थेबाबत विलेपार्ले व अंधेरी येथील जागरूक मुंबईकरांनी फेसबुक व टिष्ट्वटरवरून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना माहिती दिली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जुईली शेंडे व समीर काळे या जागरूक मुंबईकरांनी केला.

मुंबई : पुलाच्या दैनावस्थेबाबत विलेपार्ले व अंधेरी येथील जागरूक मुंबईकरांनी फेसबुक व टिष्ट्वटरवरून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना माहिती दिली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जुईली शेंडे व समीर काळे या जागरूक मुंबईकरांनी केला.या पादचारी पुलाखालून अनेक केबल्स गेल्या असून त्यांचे जाळे पसरले आहे. या केबल्ससाठी हा पादचारी पूल खोदण्यात आला होता. या कामासाठी महापालिका मोठी रक्कम संबंधित केबलधारकांकडून घेते. मात्र सदर काम बरोबर झाले आहे की नाही, येथील रस्ता योग्य प्रकारे दुरुस्त झाला आहे की नाही याची शहानिशा करत नाही. या पुलाच्या लगत असलेल्या वड व पिपळाच्या झाडांची मुळे खोलवर पसरली असून ती पुलाला अडथळा निर्माण करतात. मात्र महापालिका ही झाडे तोडत नाही. परिणामी, पूल कमकुवत झाला, असा आरोप जुईली शेंडे व समीर काळे यांनी केला.

टॅग्स :मुंबईपीयुष गोयल