Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या तरुणाची वलसाडमध्ये हत्या?

By admin | Updated: August 9, 2015 03:24 IST

मित्रांसोबत अजमेर येथे दर्शनासाठी जात असलेल्या ट्रॉम्बेमधील १७ वर्षीय तरुणाचा वलसाड (गुजरात) येथे २० जुलैला मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलिसांनी मृतदेह एका खासगी रुग्णालयात ठेवला होता.

- समीर कर्णुक,  मुंबईमित्रांसोबत अजमेर येथे दर्शनासाठी जात असलेल्या ट्रॉम्बेमधील १७ वर्षीय तरुणाचा वलसाड (गुजरात) येथे २० जुलैला मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलिसांनी मृतदेह एका खासगी रुग्णालयात ठेवला होता. मात्र शहर पोलिसांनी अज्ञात इसमाचा मृतदेह समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकून टाकले. त्यामुळे तरुणाच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून न्यायासाठी त्याचे कुटुंबीय सध्या गुजरात पोलिसांकडे हेलपाटे मारत आहेत.अरबाज शेख असे या मृत तरुणाचे नाव असून तो ट्रॉम्बे चिता कॅम्प परिसरात आजी आणि बहिणीसोबत राहत होता. २० जुलैला सकाळी काम शोधण्याच्या बहाण्याने तो घराबाहेर पडला. तो या परिसरातील ३ मित्र आणि एका मैत्रिणीसोबत अजमेर येथे गेल्याचे त्याच्या कुटुंबीयांना समजले. २२ जुलैला वलसाड रेल्वे पोलीस या तरुणाचा पत्ता शोधत ट्रॉम्बेमध्ये आले. त्यांनी आरबाजचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. वलसाड रेल्वे पोलिसांना २० जुलैला सकाळी ९ च्या दरम्यान हा तरुण बेशुद्ध अवस्थेत ट्रॅकवर आढळून आला होता. शिपायाची चौकशी ‘दोन्हीही मृतदेह अज्ञात असल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ते ओळखता आले नाहीत. आमचा एक शिपाई आम्ही ठेवलेला मृतदेह घेण्यासाठी गेला होता. त्याला याच तरुणाचा मृतदेह देण्यात आला. यामध्ये आमचे काहीही उद्दिष्ट नव्हते. मात्र ज्या शिपायाकडून ही चूक झाली, त्याची चौकशी आम्ही करत आहोत. - अंकुर पटेल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वापी टाऊन पोलीस ठाणे (गुजरात)