Join us  

दिल्लीप्रमाणे मुंबईकरांना 300 युनिट मोफत वीज देण्याची मुंबई युवक काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 8:46 PM

ग्राहकांना जादा बिल आकारणीच्या निषेधार्थ आज अंधेरी पश्चिम एस. व्ही. रोडवरील कंपनीच्या कार्यलयासमोर उत्तर-पश्चिम जिल्हा युवक काँगेसने उपोषण केले.

मुंबई- अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने मुंबईतील ग्राहकांना जादा बिल आकारणीच्या निषेधार्थ आज अंधेरी पश्चिम एस. व्ही. रोडवरील कंपनीच्या कार्यलयासमोर उत्तर-पश्चिम जिल्हा युवक काँगेसने उपोषण केले. युवक कॉंग्रेसचे उत्तर-पश्चिम जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष सुफियान मोहसिन हैदर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी स्थानिकांनी "अदानी भागाव मुंबई बचाओ", "हाय अदानी हाय अदानी"अशा जोरदार घोषणा दिल्या. अदानी कंपनीचे उपाध्यक्ष  विजय डिसूझा आणि उपाध्यक्ष  रविंद्र केदार यांना जाहीर मागण्यांचे निवेदन दिले ज्यामध्ये टाटा पॉवर सारख्या अन्य वीज पुरवठा कंपन्या, या कंपन्यांच्या वीज युनिटचे दर बेस्टने सादर केले, ज्यामध्ये अदानी कंपनीच्या वीज युनिटचे दर जास्त आहेत. मुंबई सर्व विजेचे दर वीज कंपन्यांनी समान दराने दिली पाहिजे, अशी मागणी मुंबई युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आली.सुफियान हैदर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जेव्हा दिल्लीतील नागरिकांना 300 युनिट वीज मोफत मिळू शकते तर मग मुंबईतील नागरिकांना 300 युनिट वीज का मिळत नाही? असा सवाल त्यांनी केला.एकीकडे मुंबईतील नागरिक  महागाईने त्रस्त असतांना अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने अशाप्रकारे जर  गरीबांना लुटणे थांबवले नाही तर आपण सर्वजण रस्त्यावर उतरू. मीटर तपासणीच्या बहाण्याखाली अदानी कंपनीचे अधिकारी घरांमध्ये अचानक येत असल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप सुफियान हैदर यांनी केला.

स्थानिक काँग्रेस नगरसेविका मैहर मोहसिन हैदर, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस मोहसिन हैदर, तालुका सरचिटणीस प्रतीश तिवारी, मनोज यादव,सूरज कोड, सफराज सय्यद दानिश, युवा कॉंग्रेस जोगेश्वरी तालुका जिल्हा सचिव मुन्ना पाटील, जुग्न्नू फारुकी, युवक कॉंग्रेस जोगेश्वरी पूर्व तालुका सचिव संदीप सिंग, उत्तर पश्चिम मुंबई काँग्रेस अध्यक्ष कलाईव्ह डायस, सलीम खान, के. आर., गुलाम अहमद शेख, जेष्ठ नेते अन्वर आझमी, मिया काश्मिरी व गफूर खान, जिल्हा उपाध्यक्ष फकीर मोहम्मद, प्रतिश तिवारी आणि नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.