Join us

मुंबईची भटटी झाली, कमाल तापमान ३३ अंशांवरून थेट ३७ अंशांवर

By सचिन लुंगसे | Updated: April 15, 2024 19:40 IST

उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईचे कमाल तापमान थेट ३३ वरून ३७ अंशावर गेल्याने अंगाची लाही लाही झालेला मुंबईकर हैराण झाला होता

मुंबई : डोक्यावर आग ओकणारा सुर्य, तापलेले रस्ते, लोकलमध्ये लागणा-या उष्णतेच्या झळा आणि ३७ अंश नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांची सोमवारी अक्षरश: भटटी झाली. विशेषत: उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईचे कमाल तापमान थेट ३३ वरून ३७ अंशावर गेल्याने अंगाची लाही लाही झालेला मुंबईकर हैराण झाला होता. दरम्यान, मंगळवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई समुद्रसपाटीपासून किंचित खाली आहे. इराण, अफगाणिस्तान आणि दक्षिण पाकिस्तानातून गुजरातमार्गे मुंबईत दाखल होणा-या उष्ण वा-यामुळे मुंबईमधील उष्णता वाढते आहे.- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेशात सोमवारी उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती होती. मंगळवारीही मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ ते ३९ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल.- मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्येठाणे ४१कोल्हापूर ३९सातारा ४०.१सांगली ३९.६जळगाव ४१.५अहमदनगर ४०.८छत्रपती संभाजी नगर ३९.३बारामती ३९.१उदगीर ३७.८नाशिक ४०.४पुणे ४०.८परभणी ३९.५मुंबई ३७.९मालेगाव ४२.६सोलापूर ४०.६नांदेड ३८.६जेऊर ४१.५धाराशीव ३९.५

टॅग्स :मुंबईतापमान