Join us

बुलेट ट्रेनमुळे मुंबई समृद्ध होईल...  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 07:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पाचे साबरमती येथे भूमिपूजन झाले आणि बुलेट ट्रेनवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. काहींनी प्रकल्पाचे स्वागत केले तर काहींनी नाके मुरडली.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पाचे साबरमती येथे भूमिपूजन झाले आणि बुलेट ट्रेनवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. काहींनी प्रकल्पाचे स्वागत केले तर काहींनी नाके मुरडली. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटत असतानाच मुंबईकरांनी बुलेट टेÑन प्रकल्पाचे तोंडभरून स्वागत केले आहे.वाढती वाहतूककोंडी, वाहतुकीवर वाढता ताण, वाहतुकीदरम्यान प्रवासात वाया जाणारा वेळ हे सर्व घटक लक्षात घेता मुंबईकर तरुणाईने बुलेट टेÑनला पसंती दिली आहे. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा ही पहिलीवहिली मेट्रो धावू लागल्यानंतर वाहतुकीवरील कमी झालेला ताण लक्षात घेता निश्चितच भविष्यात बुलेट टेÑनही अशीच काहीशी मदतीला धावून येईल, असा विश्वास मुंबईकरांनी व्यक्त केला आहे. विशेषत: मागील पाचएक वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रोचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पहिल्या मेट्रोला सुरुवातीला झालेला विरोध पाहता आणिनंतर मिळालेला प्रतिसाद पाहताआता प्राधिकरणाच्या उर्वरित विशेषत: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी प्रकल्पाला होणारा विरोध भविष्यात निश्चितच मावळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. अशाच काहीशा वेगवान वाहतूक प्रकल्पांत आता मुंबई ते अहमदाबाद या बुलेट टेÑनची भर पडल्याने साहजिकच वित्तीय केंद्र म्हणून ओळख असलेल्या मुंबापुरीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व आणखी वाढणार असून, रोजगारनिर्मिती वाढणार आहे.एका अर्थाने बुलेट टेÑनही मुंबईच्या आर्थिक विकासासह वाहतुकीवरील ताण कमी करण्यास हातभार लावेल, असा आशावाद मुंबईकरांनी व्यक्त केल्याने हा प्रकल्प सर्व अडथळे पार करत वेळेत पूर्ण झाला तर निश्चितच वेगवानवाहतूक अधिकच समृद्ध होईल, अशी संमिश्र प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिली आहे. (संकलन : कुलदीप घायवट)बुलेट ट्रेनचे फायदे आणि तोटेही आपण लक्षात घेतले पाहिजेत. या बुलेट ट्रेनने लांबचा पल्ला कमी वेळात पार केला जातो. सर्वसामान्यांना या बुलेट ट्रेनमधून प्रवास करणे परवडणारे आहे का? याचाही विचार करायला हवा.- प्रिया मोहिते, बोरीवलीभारतामध्ये पहिली बुलेट ट्रेन सुरू होणे, ही खूप अभिमानास्पदगोष्ट आहे; परंतु भारतातील सामाजिक आणि आर्थिक प्रश्न बघितले, तर ही सेवा खूप खर्चीक आहे.- माधुरी माने-पंडित, भायखळाबुलेट ट्रेनच्या निर्णयामुळे वाहतुकीमध्ये आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेला बुलेट ट्रेनमुळे फायदा होईल.- यज्ञेश कदम, महालक्ष्मीमेट्रो, मोनो आणि आता बुलेट ट्रेन या नवनवीन वाहतुकीच्या सुविधा भारतात येत आहेत, परंतु त्याच वेळी सरकारने सध्या तरी रेल्वेच्या विकासावर भर द्यावा.- प्रभाकर थोरात, विक्र ोळीप्रत्येक गोष्टीकडे फायदा आणि तोट्याच्या रूपात बघणे चुकीचे आहे. बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प होणे गरजेचे आहेत.- मितेश लोटलीकर, ग्रँट रोडवेगवान प्रवासासाठी बुलेट ट्रेनचे स्वागत करायला हवे. सुरक्षित प्रवास करण्यासाठी बुलेट ट्रेन गरजेची आहे.- प्रतिमा कदम, अंधेरीएखादा विशिष्ट गटाला डोळ्यांसमोर ठेवून बुलेट ट्रेन सुरू करणे चुकीचे आहे. बुलेट ट्रेनवर इतका खर्च करण्यापेक्षा एक्स्प्रेस, लोकलवर खर्च केला तर आरामदायी, अपघातमुक्त प्रवास करता येईल.- सायली पेंडसे, मीरा रोडबुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. यापेक्षा सरकारने शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि होणारे अपघात हे प्रश्न सोडवावेत.- दीपक मोरे, भांडुपभारताला विकसित करण्यासाठी अशा योजना राबविणे गरजेचे आहे. नवीन काहीतरी होत आहे. त्यामुळे त्याला खोडा घालणे चुकीचे आहे. बुलेट ट्रेनमुळे उद्योगधंद्याना फायदा होईल.- रोहन पिंगळे, विरारएका नव्या गतीने प्रगतीला सुरुवात होत आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान भारताकडे असणे गरजेचे आहे. बुलेट ट्रेनचे स्वागत आहे.- अभिषेक दोंदे, माटुंगाभारतात धावणाºया रेल्वेवर खर्च करून, त्यामध्ये सुधारणा करावी, जेणेकरून रेल्वेचे होणारे अपघात कमी होतील.- सौरभ दली, गिरगावबुलेट ट्रेनमुळे दळणवळणाचावेग वाढेल. उद्योगधंद्याना प्रोत्साहन मिळेल. रोजगाराच्या संधीवाढतील.- आशिष डगळे, कुर्लावेळेची बचत, आरामदायक प्रवास, अशा सर्व फायद्यांमुळे बुलेट ट्रेन या प्रकल्पाचा निर्णय योग्य आहे.- सिद्धेश मोरे, विलेपार्ले

टॅग्स :मुंबईबुलेट ट्रेन