Join us  

मुंबई विद्यापीठ राज्यात प्रथमस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:15 AM

मुंबई : क्यूएस इंडिया युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठ प्रथम क्रमांकावर पोहोचले आहे, तर देशातील सर्वोत्तम ...

मुंबई : क्यूएस इंडिया युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठ प्रथम क्रमांकावर पोहोचले आहे, तर देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठ चौथ्या क्रमांकावर आहे. क्वाकरेली सायमंड(क्यूएस) यांनी देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली असून, या यादीमध्ये राज्यात मुंबई विद्यापीठाची कामगिरी सर्वोत्तम आहे, तर मुंबई आयआयटी देशात पहिल्या स्थानी आहे.

क्यूएसच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत, अनेक व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात १०४ टक्क्यांनी पदवी आणि ११२ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, तर दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १४७ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. विद्यापीठाच्या १२ विभागांना अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमांत मान्यता मिळाली आहे. पाच वर्षांत १८ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने येथील प्राध्यापकांना गौरविल्याचेही अहवालात नमूद आहे.

दरम्यान, मुंबई आयआयटीने देशभरातल्या सर्वच संस्थांना मागे टाकत, क्यूएस इंडिया रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. इतर सर्व विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ १४ व्या तर पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ १९व्या स्थानी आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठमहाराष्ट्र