Join us  

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 7:27 AM

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाला शिवडी-न्हावा-शेवा म्हणूनही ओळखले जाते. हा प्रकल्प २२ किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूपाचे काम सुरू झाले आहे.

- कुलदीप घायवटमुंबई  - मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाला शिवडी-न्हावा-शेवा म्हणूनही ओळखले जाते. हा प्रकल्प २२ किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूपाचे काम सुरू झाले आहे. शिवडी येथील तिवरांच्या प्रदेशात हे काम सुरू झाले असून त्यामुळे तिवरांची शेकडो झाडे तोडण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे मुंबईतील विकासात्मक प्रकल्प पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहेत. विकास जरूर व्हावा, पण जेथे जेथे शक्य आहे तेथे पर्यावरणाची काळजी घेतली जावी, असा सूर पर्यावरणवाद्यांमधून उमटत आहे.मुंबईतील पाणथळ जमीन जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. दरवर्षी हजारो विदेशी पक्षी शिवडीतील तिवरांच्या प्रदेशात येतात.यात फ्लेमिंगोंचे प्रमाण अधिक आहे. मात्र यंदा एप्रिलपासून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पक्ष्यांची असणारी संख्या दिसून आली नाही. दरवर्षी येथे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे कार्यक्रम राबविला जातो. मात्र यंदाचा कार्यक्रम देखील झाला नाही.विकासात्मक प्रकल्प राबविताना पर्यावरणाचा विचार केला जात नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करतात. शेकडो-हजारो वर्षांपासून असलेले पर्यावरणाचे चक्रएकेक करत आपण नष्ट करत आहोत. त्यातून संपूर्ण मानवापुढे संकट वाढणार आहे.त्सुनामी रोखण्यासाठी तिवर महत्त्वाचे : त्सुनामी, वादळे, मोठ्या लाटा, पूर यापासून बचावासाठी तिवर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे किनारपट्टीवरील तिवरांची जंगले वाचविणे गरजेचे आहे. मात्र विकासाच्या नावाखाली बेसुमार जंगलाची कत्तल होत आहे. पर्यावरण खाते, वनविभाग या प्रकल्पांना परवानगी देऊन भविष्यातील संकटाला आमंत्रण देत आहेत. पुनर्रोपणाच्या नावाखाली सुकलेली आणि मृत झालेली झाडे लावण्यात येत असल्याचे मेट्रो-३ च्या प्रकल्पातून यापूर्वी उघड झाले आहे. भविष्यात असे होता कामा नये. त्यामुळे पुनर्रोपणावर कितपत विश्वास ठेवावा, असा सवाल आता पर्यावरण अभ्यासक उपस्थित करत आहेत.काम पूर्ण झाल्यानंतर ‘फ्लेमिंगो फेस्ट’च्शिवडीतील पाणथळ प्रदेशावरील अतिक्रमणामुळे जैवविविधता आधीच धोक्यात आहे. तिवरांच्या कत्तलीमुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट होऊन मुंबईमधील जीवसृष्टी संपुष्टात येईल, असेही पर्यावरणप्रेमींची म्हणणे आहे.च्याच कारणामुळे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) पुढील ३ ते ४ वर्षे फ्लेमिंगो फेस्टिव्हल करणार नसल्याचे त्यांनी कळविले आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे एमटीएचएलचे बांधकाम पूर्ण होत नाही; तोवर हा फेस्टिव्हल होणार नाही.च्हे काम पूर्ण झाल्यावर बीएनएचएस आणि फ्लेमिंगो फेस्टिव्हलच्या साहाय्याने एमएमआरडीएकडून विशेष प्रकारचे फ्लेमिंगो प्रेक्षणीय स्थळ विकसित करण्यात येणार आहे. फ्लेमिंगो पाहण्यास उत्सुक असलेल्या पर्यावरणप्रेमींना सध्या ठाणे खाडी प्रदेशात जाऊन हे पक्षी पाहता येऊ शकतात, यासाठी मॅनग्रोव्ह फाउंडेशनकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.च्सध्या नवी मुंबई आणि उरण या भागातदेखील मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो दिसून आल्याचे बीएनएचएसच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम सुरू असल्याने येथे दरवर्षी दिसणारे फ्लेमिंगो दिसले नाहीत. शिवडी येथील साधारण १०० मीटर अंतरातील तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या ठिकाणी फ्लेमिंगो अधिक येण्याचे कारण म्हणजे त्यांना येथे मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. ओहोटीवेळी वाळूत ‘एल्गी’ खाद्यपदार्थ खाण्याकडे पक्ष्यांचा कल असतो. फ्लेमिंगोचा गुलाबी रंग याच ‘एल्गी’मुळे येतो. जून महिन्याचा काळ हा पशू-पक्ष्यांचा प्रजनन काळ असतो. त्या वेळी त्यात हस्तक्षेप होता कामा नये. सध्या होत असलेल्या कामांमुळे पक्ष्यांना त्रास होतोय, हे नक्की. मात्र पुढील वर्षी शिवडी येथे फ्लेमिंगो किती प्रमाणात दिसतील ही शंकाच आहे. - नीरज चावला, पर्यावरणप्रेमी१५० पक्ष्यांच्या प्रजाती शिवडी येथील पाणथळ प्रदेशात दिसून येतात. यामध्ये कायम वास्तव करणारे आणि काही पाहुणे पक्षी येतात. दरवर्षी या ठिकाणी फ्लेमिंगोंच्या बरोबरीने इतर विदेशी पाहुण्यांचीही हजेरी असते. कॉमन सॅन्डपिपर (तुतवार), वुल्ड सॅन्डपिपर, लेसर सॅन्ड पोव्हर (छोट्या चिखल्या), लिटिल रिंग पोव्हर, ब्लॅक हेड आयबीस् ( कुदळ्या), कॉर्मोरंट, टर्न, ब्लॅक टेल्स गॉडविट (मळगुजा), ब्लॅक हेड गुल (काळ्या डोक्याचा कुरव), इग्रेट, स्पॉटेड रेडशैंक (ठिपक्यांचा टिलवा), ग्रीनहाँक (हिरवा टिलवा), राखी बगळा, जांभळा बगळा हे पक्षी दिसून येतात. फ्लेमिंगोमध्ये लेसर फ्लेमिंगो आणि ग्रेटर फ्लेमिंगो असे दोन प्रकारचे फ्लेमिंगो येथे भेट देतात. ग्रेटर फ्लेमिंगोंची संख्या कमी असून लेसर फ्लेमिंगोंची जास्त आहे.मग तिवरांची कत्तल कोणाकडून?न्हावा-शेवा प्रकल्पाच्या ठिकाणी शिवडीत एमएमआरडीएने कुठेही झाडे तोडलेली नाहीत. वनविभागाकडून त्यासाठी परवानगी घेण्याचे काम सुरू आहे. जी झाडे तोडली जातील, त्यांचे पुनर्रोपण वनविभागाकडून होणार आहे. सध्या तोडलेली झाडे आम्ही तोडली नसून यासंदर्भातील सर्व कार्यवाही वनविभागाकडून होणार आहे.- दिलीप कवटकर, प्रवक्ते, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतिवरांमुळेचजीवसाखळी अबाधितमानवी जीवन अबाधित ठेवण्यासाठी तिवरांचे प्रदेश आणि पाणथळ जागा अत्यंत महत्त्वाचे आहेत. समुद्र आणि जमिनीचा संपर्क होण्याआधी तिवरांच्या क्षेत्राचा संपर्क होतो. त्यामुळे येथे जीवसाखळी अबाधित राहते. शिवडी येथे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी येतात. मात्र बांधकामामुळे येथे येणारे पक्षी स्थलांतरित होऊन अन्य राज्यांत जाण्याची शक्यता आहे. वाशी, ठाणे खाडी, ऐरोली या पाणथळ भागात अनेक पक्षी येतात. त्यामुळे येथील जैवविविधता टिकून राहणे आवश्यकआहे.- संजय शिंगे, पर्यावरणवादीपर्यायांचा विचारहोता गरजेचामुंबईच्या ट्रान्स हार्बर लिंकचा मार्ग बदलला असता; तर शिवडीतील तिवरांची झाडे वाचविता आली असती. प्रकल्पाचे अभियंते, अधिकारी यांना सोप्यारीतीने हे काम करायचे होते. प्रकल्प आकार घेत असताना केवळ प्रशासनाच्या हट्टीपणामुळे प्रकल्पाचा मार्ग बदलला नाही. पर्यावरणाचे नुकसान करूनच विकासात्मक प्रकल्पांची प्रथा सरकारद्वारे बनविली जात आहे. विदेशातून देशात पाहुण्यांसारख्या येणाऱ्या पक्ष्यांना हाकलून देण्याचेच हे काम म्हणावे लागेल. तिवरांच्या झाडांची कत्तल होत असून त्यामुळे मुंबईतील तिवर क्षेत्रे धोक्यात आहेत.- डी. स्टॅलीन, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :मुंबईवातावरण