Join us  

Mumbai Train Update : कांजूरमार्ग स्थानकाजवळ 'रेल रोको', मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 9:10 AM

Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठळक मुद्देऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत कांजूरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाने रेल रोको केला आहे.मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कांजूरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाने रेल रोको केला आहे. या रेल रोकोचा फटका मध्य रेल्वेला बसला असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. बुधवारी (29 जानेवारी) सकाळी मध्य रेल्वे मार्गावरील कांजूरमार्ग स्थानकाजवळ जवळपास अर्धा तास रेल रोको करण्यात आला. यामुळे वाहतूक ही 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. कल्याण, डोंबिवलीहून दररोज सकाळी हजारो प्रवासी सीएसटीएमच्या दिशेने प्रवास करतात. मात्र आज सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

बहुजन क्रांती मोर्चाने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात भारत बंदची आज हाक दिली आहे. बंद यशस्वी व्हावा यासाठी काही आंदोलक हे रेल रोको करण्यासाठी ट्रॅकवर उतरले होते. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ट्रॅकवरुन हटवलं असून ताब्यात घेतलं आहे. यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र जवळपास अर्धा तास रेल रोको असल्यामुळे वाहतूक उशिराने सुरू आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का?; शिवसेनेचा सवाल 

Delhi Election : 'आप' विरोधात भाजपाचे 200 खासदार मैदानात

विचित्र अपघात : रिक्षासह एसटी बस विहिरीत; 25 प्रवासी ठार, 30 जखमी

चीनमधील भारतीयांना विमानाने आणणार; कोरोनाग्रस्त वुहानमध्ये २५0 विद्यार्थी

‘एअर इंडिया’च्या विक्रीसाठी अटी आणखी शिथिल करणार, उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांची माहिती

सलग तीन दिवस बँका राहणार बंद, इंडियन बँक असोसिएशनने दिली संपाची हाक

 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटमध्य रेल्वेभारत बंदलोकलमुंबई