Join us  

Mumbai Train Update : भांडुप ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 10:14 AM

ऐन गर्दीच्या वेळी रविवारी (1 सप्टेंबर) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ठळक मुद्देऐन गर्दीच्या वेळी रविवारी (1 सप्टेंबर) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भांडुप ते कांजुरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. घाटकोपरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल खोळंबल्या आहेत.

मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी रविवारी (1 सप्टेंबर) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भांडुप ते कांजुरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटकोपरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल खोळंबल्या आहेत. मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांचे आणखी त्रास सहन करावा लागत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी मध्य रेल्वेवरील  भांडुप ते कांजुरमार्ग स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहे. याचा फटका जलद आणि धिम्या मार्गावरील लोकल सेवेला बसला आहे. तसेच मध्य रेल्वेची घाटकोपरहून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे. कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. आज लोकल उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटलोकलमुंबईठाणेमध्य रेल्वे