अलिबाग : फणसाड अभयारण्यात वर्षा सहलीसाठी मुंबईतील सांताक्रूझ (आगरीपाडा) येथील १६ पर्यटक गेले होते. त्यापैकी सत्यप्रसाद कुरतडकर (२५) हा धरणाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. रेवदंडा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ अद्यापही बेपत्ता तरुणाचा शोध घेत आहेत.रविवार असल्याने फणसाड पर्यटकांनी गजबजून गेले होते. मात्र पाऊस नसल्याने धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत नव्हते. अतिउत्साही पर्यटक धरणाच्या पाण्यात उतरले. त्यानंतर सत्यप्रसाद पाण्यामध्ये ओढला गेला. त्याचे सहकारी शोध घेऊ लागले, परंतु तो सापडला नाही. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. याबाबत रेवदंडा पोलीस तपास करीत आहेत.
फणसाड धरणात मुंबईचा पर्यटक बेपत्ता
By admin | Updated: July 14, 2015 00:26 IST