Join us

सीए परीक्षेत मुंबईचा देवल देशात तिसरा

By admin | Updated: July 17, 2015 05:12 IST

दी इन्स्टिटयूट आॅफ चार्टर्ड अकाऊटंस आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीएच्या मुख्य परीक्षेत मुंबईच्या देवल मोदीने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

मुंबई : दी इन्स्टिटयूट आॅफ चार्टर्ड अकाऊटंस आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीएच्या मुख्य परीक्षेत मुंबईच्या देवल मोदीने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. यंदाचा निकाल ८.२६ टक्के लागला आहे. तर दिल्लीच्या शैली चौधरी आणि सुकंदराबाद येथील राहुल अग्रवाल या दोघांनी ७५.७५ टक्के मिळवून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. मच्छलीपट्टणमच्या चितुरी लक्ष्मी अनुषाने दुसरे तर देवलने ७१.८८ टक्के गुण मिळवित तिसरे स्थान पटकावले.