Join us

मुंबईतही ‘सोच तेथे शौचालय’

By admin | Updated: July 11, 2015 23:44 IST

घराघरांत शौचालय बांधण्याचा संदेश देणाऱ्या अभिनेत्री विद्या बालनप्रमाणे आता महापालिकेचे कर्मचारीही झोपडपट्ट्यांमध्ये असे सर्वेक्षण करणार आहेत.

मुंबई : घराघरांत शौचालय बांधण्याचा संदेश देणाऱ्या अभिनेत्री विद्या बालनप्रमाणे आता महापालिकेचे कर्मचारीही झोपडपट्ट्यांमध्ये असे सर्वेक्षण करणार आहेत. मुंबईतील किती नागरिक आजही उघड्यावर शौचाला बसतात, याचा अंदाज घेऊन त्या प्रमाणात शौचालये बांधण्यात येणार आहेत़केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे़ याच पार्श्वभूमीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान व शहरात स्वच्छ मुंबई अभियान हाती घेण्यात आली आहे़ या मोहिमेंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी उघड्यावर शौच करणाऱ्या कुटुंबांचा शोध घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़या संदर्भात पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याने परिपत्रक काढून सर्वेक्षणाची तयार सुरु केली आहे़ या मोहिमेतील कनिष्ठ अधिकारी घरोघरी जाऊन तुमच्या घरात शौचालय आहे का? असा सवाल करणार आहे़ हा अहवाल तयार झाल्यानंतर मुंबईत आणखी किती शौचालयांची गरज आहे याचा अंदाज घेऊन तेवढे शौचालय बांधण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)