Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: दिंडोशीत खड्यात पिंडदान करून केला मुंबई महानगरपालिकेचा निषेध!

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 28, 2023 13:32 IST

Mumbai: मुंबई विभागीय राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीने(शरद पवार गट) आज सकाळी मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज ,रमेश हॉटेल समोर चक्क खड्यात पिंडदान करून महिलांनी खड्ड्यात कपडे धुवून व झाडे लावून  निषेध केला.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - मुंबई विभागीय राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीने(शरद पवार गट) आज सकाळी मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज ,रमेश हॉटेल समोर चक्क खड्यात पिंडदान करून महिलांनी खड्ड्यात कपडे धुवून व झाडे लावून  निषेध केला.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी मुंबई कार्यध्यक्ष राखी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष अजित रावराणे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोशी तालुक्याच्या वतीने महानगर पालिकेच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ  सदर आंदोलन छेडण्यात आले. दिंडोशीत खड्डेच खड्डे चोहीकडे गेली पालिका कोणीकडे असा सवाल त्यांनी यावेळी केला. दिंडोशीत ठिकठिकाणी खड्डयाचे साम्राज्य निर्माण झाले असतानाही महानगर पालिका सुस्त झालेली असल्याने सदर आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती अजित रावराणे यांनी लोकमतला दिली.

यावेळी दिंडोशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कर्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थिती राहून खड्डे लवकरात लवकर नं बुजावल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असे महानगर पालिकेला ठणकावून  सांगितले अशी माहिती दिंडोशी तालुका अध्यक्ष निलेश चाळके यांनी दिली.

यावेळी पक्षाचे मुबंई पदाधिकारी  रघुनाथ कोठारी, शेखर चव्हाण, तसेच जिल्हा पदाधिकारी शेहराज मलिक,अंजली कदम, सुरेश सावंत,तालुका पदाधिकारी, तालुका फ्रंटल प्रमुख, वार्ड अध्यक्ष, महिला वार्ड अध्यक्षा आणि महिला मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थिती होते.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका